कोकण मार्गावर ८ रेल्वेगाड्या धावल्या विलंबाने, प्रवाशांची रखडपट्टी
कोकण मार्गावर रविवारी सुट्टीच्या दिवशी ८ रेल्वेगाड्या विलंबाने धावल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. ११०९९ एलटीटी-मडगांव एक्स्प्रेस तब्बल ७ तास उशिराने धावली. अन्य ७ गेल्वेगाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाल्याने प्रवासी खोळंबले. कोकण रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही.
दिपावली सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाल्याने कोकण मार्गावरून धावणार्या सर्वच रेल्वेगाड्यांचा आतापासूनच हाऊसफुल्ल धावत आहेत. एकीकडे रेटारेटीचा प्रवास सुरू असताना दुसरीकडे विलंबाने प्रवासाची भर पडत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. रविवारीही विस्कळीत वेळापत्रकाचा प्रवाशांना फटका बसला. ०११३० क्रमांकाची थिरूवअनंतपुरम- एलटीटी स्पेशल १ तास तर ०११३९ क्र. ची नागपूर-मडगांव स्पेशल ४ तास उशिराने मार्गस्थ झाली. १०१०३ क्र. ची सीएसएमटी-मडगांव मांडवी एक्स्प्रेस १ तास २० मिनिटे तर १०१०४ क्र. ची मडगांव-सीएसए:टी मांडवी एक्स्प्रेस १ तास विलंबाने रवाना झाली. १२१३४ क्र. ची मंगळूर सीएसएमटी एक्स्प्रेस १ तास ४० मिनिटे तर १६३३७ क्र. ची होका एक्स्प्रेस ३ तास विलंबाने मार्गस्थ झाली. या पाठोपाठ १९५७८ क्र. ची जामनगर-तिरूनेलवेली एक्स्प्रेस १ तास ४० मिनिटे तर १२६७८ क्र. ची निजामुद्दीन एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस ५० मिनिटे विलंबाने धावली.
www.konkantoday.com