
तात्पुरत्या शिक्षकमानधनासाठी तरतूद केलेली सेसमधील २ कोटी १० लाखांची रक्कम संपल्याने जि.प. शिक्षण विभागासमोर मोठा पेच
जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील मोठ्या प्रमाणात रिक्त झालेल्या शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी मानधनावर तात्पुरती ६८४ जणांची शिक्षक भरती केली. पण त्यांच्या मानधनासाठी तरतूद केलेली सेसमधील २ कोटी १० लाखांची रक्कम संपल्याने जि.प. शिक्षण विभागासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या आंतरजिल्हा बदली तसेच सेवानिवृत्तीमुळे शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे प्राथमिक शाळांसमोर मोठी समस्या उभी ठाकली होती. दर महिन्याला सेवानिवृत्त होणार्या शिक्षकांची संख्या तसेच रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया व आंतरजिल्हा बदलीने सुमारे सव्वासातशे शिक्षक जिल्ह्याबाहेर गेले. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे २ हजारांवर पोहोचली. मंजूर पदांच्या तुलनेत २५ टक्केहून अधिक पदे रिक्त राहिली. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता घसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली. त्यावर विरोधकांनी शिसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेत जिल्हा परिषदेवर हल्लाबोल आंदोलन करत शिक्षक नेमावेत, अशी मागणी केली होती.
www.konkantoday.com