पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढ विरोधात रत्नागिरीत काँग्रेस पक्षाचे आंदोलन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ॲड विजयराव भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस भवन कार्यालय येथे पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रातील मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आला.
त्याप्रसंगी पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ रद्द झाली पाहिजेच फलक हातात घेऊन मोदी सरकार हाय हाय,ह्या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय, पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ रद्द झालीच पाहिजे अशा घोषणांनी काँग्रेस भवन परिसर दणाणून गेला होता. तदप्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड विजयराव भोसले, जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, जिल्हा सरचिटणीस दिपक राऊत, मिडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे, प्रदेश महिला सरचिटणीस रुपाली सावंत, महिला जिल्हाध्यक्षा ॲड अश्विनी आगाशे,जिल्हा चिटणीस तेजश्री गोतंम , विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन मालवणकर,महिला तालुका अध्यक्ष रिजवाना शेख,प्रमोद सक्रे, युवकचे दर्शन सक्रे जयसिंग राऊत, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button