मिस्टर इंडिया २०२३’ शरीरसौष्ठव स्पर्धेत सुरेश भातडेला सुवर्ण पदक


रत्नागिरी:- नुकत्याच झालेल्या ‘मिस्टर इंडिया २०२३’ शरीरसौष्ठव स्पर्धेत रत्नागिरीचा सुरेश सत्यवान भातडे सुवर्ण पदकाचा तर मिस्टर युनिव्हर्स इंडिया या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदकाचा मानकरी ठरला.

सलग चार दिवस झालेल्या या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत देश- विदेशातील स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत एकापेक्षा एक आकर्षक पोज देत सुरेशने उपस्थितांची मने जिंकली.

फणसोप ता. रत्नागिरी येथे राहणाऱ्या सुरेशने २०१३ पासून फिनिक्स हार्डकोअर जिममध्ये जाण्यास सुरुवात केली. २०१४ मध्ये ज्युनियर मिस्टर इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्याचप्रमाणे इतर मोठ्या स्पर्धेतही पदके पटकावली आहे.

मि. युनिव्हर्स महेश भिंगारकर, दिनेश शेळके, सदानंद जोशी, राज नेवरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शैलेश जाधव यांच्या फिनिक्स हार्डकोअर जिम व्यायामशाळेत सध्या सहा ते सात तास व्यायामाचा सराव करत असल्याचे सुरेशने सांगितले. शरीरसौष्ठव स्पर्धा आव्हानात्मक असल्याने आणि खर्चिक खेळ आहे . दर महिन्याला डाएट बदलले जात असल्याचे सुरेश सांगतो. आगामी मोठ्या स्पर्धांसाठी सुरेश सराव करत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणे सुरेशचे स्वप्न आहे. त्यासाठी तो सध्या मेहनत घेत आहे. त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई- वडिलांबरोबरच भावाचे तसेच त्याच्या मित्रांचे मोलाचे सहकार्य, पाठबळ मिळत असल्याचे त्याने आवर्जून सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button