
महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी एस.चौकलिंगम यांची नियुक्ती
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे फेरबद केले जात आहेत. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी एस.चौकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.एस.एम. देशपांडे यांच्या जागी त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने चोकलिंगम यांच्या नियुक्तीचे आदेश केले जारी केले आहेत. एस.चौकलिंगम वरिष्ठ सनदी अधिकारी असून सध्या पुण्यातील यशदाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेतलोकसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. त्यामुळे संपूर्ण देशभर सध्या सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सरू आहे. प्रशासकीय पातळीवरही मोठे फेरबदल होत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या जात आहेत. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी एस.चौकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.www.konkantoday.com