गोदाम व्यवस्थापनात रत्नागिरीला ‘फाईव्ह स्टार’ नामांकन : कैलास वाघ
कोव्हीड महामारीत भारतीय अन्न महामंडळाने शेतकर्यांचे हित जपले
सामान्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी एफसीआय सदैव तत्पर : एफसीआय रत्नागिरी ची माहिती
रत्नागिरी : केंद्र सरकार व भारतीय अन्न महामंडळ हे शेतकरी व सर्व सामान्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगत रत्नागिरी डेपोला क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाकडून फाईव्ह स्टार नामांकन मिळाल्याची माहिती एफसीआय रत्नागिरी येथील क्वॉलिटी कंट्रोल मॅनेजर श्री. कैलास वाघ यांनी सांगितले.
केंद्र सरकारद्वारे राबविल्या जाणार्या योजना व भारतीय खाद्य निगमच्या कार्यप्रणालीबद्दल जनसामान्यांना अधिकाधिक माहिती पोहचवण्यासाठी व भारतीय खाद्य निगममधील पारदर्शकता, अधुनिकीकरण, तंत्रज्ञानाचा वापर या विषयी माहिती देण्यात आली.
भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ अधिकारी महाव्यवस्थापक मनमोहन सिंग सारंग व भारतीय खाद्य निगम पनवेलच्या विभागीय व्यवस्थापक श्री. मारुथी डी. एन. यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांशी संवाद साधण्यात आला.
या वेळी डेपो कार्यालयातील श्री. एस. एन. गायकवाड, प्रबंधक ( डेपो), तकनिकी/ डेपो सहायक सुजय शिंदे, श्वेतांक हुन्द्रे, पवन पाटील, रमेश शिंत्रे, सच्चिदानंद भोसले, अभया कुलकर्णी, अभिजित जांभळे, नीलेश परब, विलास गुरव उपस्थित होते.
यावेळी भारतीय अन्न महामंडळाच्या कार्यप्रणाली संदर्भात माहिती देताना रत्नागिरी येथील गुणनियंत्रण प्रबंधक कैलास वाघ म्हणाले की, महामंडळाचे महत्त्वाचे धोरण हे आहे की, शेतकर्यांचे हित जपण्यासाठी प्रभावी किंमत/हमी भाव, विशेषत: समाजातील असुरक्षित घटकांना वाजवी दरात अन्नधान्य उपलब्ध करून देणे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी देशभरात अन्नधान्याचे वितरण –राष्ट्रीय अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अन्नधान्याच्या कार्यात्मक आणि बफर साठ्याची समाधानकारक पातळी राखणे, किंमत स्थिरीकरणासाठी बाजारात हस्तक्षेप करणे अशा स्वरुपाची महामंडळाची कार्यप्रणाली आहे.
केंद्र सरकारच्या ह्या महत्वपूर्ण महामंडळाच्या महाराष्ट्र राज्यात 08 विभागीय कार्यालय बोरिवली, पनवेल, पुणे, औरंगाबाद, मनमाड, अमरावती, नागपूर व गोवा यथे असून राज्य सरकारच्या समन्वयाने सार्वजनिक अन्नधान्य वितरण प्रणाली मध्ये सुसूत्रता आणून प्रत्येक गरजूंना योग्य वेळी पोषक अन्न ध्यान पोहचवण्यास भारतीय खाद्य निगम कटिबद्ध असल्याची माहीती दिली. तसेच विभागीय कार्यालय, पनवेल अंतर्गत एकुण 3 महसुली जिल्हे असुन त्याअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी 1 FCI गोदामातुन व 1 महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदामातुन सार्वजनिक वितरण प्रणाली तसेच केंद्र सरकारच्या इतर योजने अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी धान्य वितरीत केले जाते. प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय अन्न योजना अंतर्गत लाभार्थी याना ८३७ स्वस्त धान्य दुकनामार्फत धान्य रत्नागिरी जिल्ह्यामधील तालुक्यात वितरित केले जाते.
‘आझादी का अमृत महोत्सव’ हा भारत सरकारचा स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा आणि तेथील लोकांचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरे करण्याचा उपक्रम आहे. हा अमृत महोत्सव साजरा करत असताना भारतीय अन्न महामंडळखने संपूर्ण देशाला खाद्य सुरक्षा पुरवन्यात मह्त्वाची भूमिका बजावली आहे.
कोव्हिडसारख्या जीवघेण्या महामारीमध्ये जेव्हा सर्व सार्वजनिक कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असताना भारतीय खाद्य निगमच्या धोरण व उद्दीष्टाला न्याय देण्यासाठी भारतीय खाद्य निगम महाराष्ट्रने मराठवाडा व विदर्भामधील कडधान्य उत्पादक शेतकर्याकडून चणा, उडीद, मूगची हमी भाव वर खरेदी करून शेतकर्यांच हित जपण्याचा प्रयत्न केला.
केंद्र सरकार कडून वन नेशन वन रेशन कार्ड ही योजनाही राबविण्यात येत आहे तसेच ही प्रणाली विशेषत: स्थलांतरित (Migrated) लाभार्थ्यांना, अखंडपणे बायोमेट्रिक व् आधार कार्ड प्रमाणीकरणासह विद्यमान रेशन कार्डद्वारे देशातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून पूर्ण किंवा अंशतः अन्नधान्याचा लाभ घेऊ देते तसेच याचा सर्वात जास्त फायदा स्थलांतरित मजुरांना होतो आहे. कुपोषणामुळे अशक्तपणाच्या गंभीर समस्येचा सामना करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नात, पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी 2024 पर्यंत सर्व सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये तांदळाचे फोर्टिफिकेशन अनिवार्य करण्याची घोषणा केली आहे. या मध्ये तांदूळ मजबूती, सूक्ष्म अन्नद्रव्ये जोडण्याची प्रक्रिया, अल्प कालावधीत पोषण समस्येचे निराकरण करण्यासाठी एक प्रभावी, प्रतिबंधात्मक आणि खर्च–कार्यक्षम पूरक धोरण आहे.
फोर्टिफिकेशन म्हणजे फोर्टिफाइड राइस कर्नल (एफआरके), ज्यामध्ये FSSAI निर्धारित सूक्ष्म अन्नद्रव्ये (आयरन, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन बी 12) सामान्य तांदूळ (कस्टम मिल्ड राईस) मध्ये 1:100 च्या प्रमाणात जोडण्याची प्रक्रिया आहे. फोर्टिफाईड तांदूळ हा सुगंध, चव आणि पोत यामध्ये पारंपरिक भातासारखाच असतो. भारतीय खाद्य निगमने पारंपरिक कार्यप्रणाली व अन्न ध्यान वितरण व्यवस्थेशी सांगाड घालत नवनवीन पूरक व नैसर्गिक स्रोताचा वापर करण्यावर भर देत गेला आहे. Fci द्वारा दैनंदिन कार्यालय कामकाजामध्येही माहिती व तंत्रज्ञानखचा पुरेपूर वापर केला जातो त्या अनुषंगाने कठचड ही अधिकारी व कर्मचारी यांचे मानवी व्यवस्थापन करणारे तंत्रज्ञान यशस्वी पणे आत्मसात केले आहे. DOS (Depot Online System) – रिअल टाइम स्टॉक मॅनेजमेंट सॉफ्टवेअर या प्रणाली अंतर्गत भारतीय खाद्य निगम द्वारा गोदामखतील सर्व कार्य जसे की धान्याची आवक व जावक ऑनलाईन पद्धतीने डिजिटल प्रणालीने केली जात आहेत. केंद्र सरकारच्या पेपरलेस ऑफिस या संकल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी इ-ऑफिस द्वारे सर्व कामे ऑनलाइन माध्यमाने तसेच पर्यावरण पूरक व पेपरलेस काम करण्याचा यशस्वी प्रयत्न भारतीय खाद्य निगम द्वारे केला जात आहे. महामंडळ FSSAI नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करते आणि उच्च दर्जाच्या सेवा महाराष्ट्रातील लोकांना देण्यासाठी वचनबद्ध आहे.
कॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया कडून ‘5 स्टार’
महामंडळाच्या डेपोच्या गोदाम व्यवस्थापन पद्धतींसाठी WDRA, QCI (क्वालिटी काऊंसिल ऑफ इंडिया) या एजन्सीद्वारे ऑडिट केले गेले आहे. त्यामध्ये रत्नागिरी डेपोला फाईव्ह स्टार नामांकन दिले गेलेले आहे व भविष्यातही या एजेंसीकडून ऑडिट केले जाणार असल्याचे श्री. वाघ यांनी यांनी सांगितले.
www.konkantoday.com