
गोव्यात बियरपेक्षा टोमॅटो झाले महाग
भारतातील सर्वात महत्वाचं आणि मुख्य पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यामध्ये टामॅटो, तेल या रोजच्या वापरातील गोष्टी खरेदी करणे आता बियर खरेदी करण्यापेक्षा अधिक अवघड झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार गोव्यातील लोकप्रिय गोवा किंग्ज पिल्सनर बियर ६० रुपयाला मिळत असून त्यापेक्षा टोमॅटो प्रतिकिलो अधिक महाग पडत आहेत.
सध्या गोव्यामध्ये टोमॅटोची किंमत १०० रुपयांच्या घरात पोहोचली आहे. पेट्रोलही महागच आहे. पण दुसरीकडे बियर मात्र ६० रुपयांना मिळत आहे. www.konkantoday.com