आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नाही -मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज (1 नोव्हेंबर) आठवा दिवस आहे.आज संध्याकाळी (1 नोव्हेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नाही असं म्हटलं.
मनोज जरांगेंनी म्हटलं की, “आमचा नाईलाज आहे, आम्हाला कठोर लढावं लागेल. होणाऱ्या सगळ्या प्रकाराची जबाबदारी सरकारवर राहावं. सरकार जाणूनबुजून गुन्हे दाखल करत आहे. वकील बांधवांनी आपल्या मराठा बांधवांसोबत उभं राहावं.”
“मराठे काही दोन-चार नाहीत. पाच-सहा कोटी आहेत. गुन्हे दाखल झाल्यापासून हा तरुण जास्त आक्रमक झाला आहे, आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, तरी सरकार जाणीवपूर्वक आरक्षण देत नाहीये.”
मराठे शांततेत आंदोलन करणार आहेत. मात्र सरकारवर वातावरण दूषित करण्याचा आरोप त्यांनी केला.
‘मला कधीपर्य़ंत बोलता येईल आणि कधी माझं बोलणं एकदम थांबेल हे आता सांगता येणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला
www.konkantoday.com