रत्नागिरी शहरानजिक भाट्ये चौपाटीवरील अतिक्रमणाची तहसीलदारांकडून पाहणी
रत्नागिरी शहरानजिक भाट्ये येथील चौपाटीवर अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकाम प्रकरणी तलाठी सजा फणसोप यांनी सी.आर.झेडची नोटीस देत बांधकाम पाडून टाकण्याची नोटीस बजावण्यात आलेली होती. मात्र यानंतरही हे बांधकाम पाडण्यात आलेेले नसल्याने प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर जात पाहणी केली आणि लवकरच याबाबतचा अहवाल प्रांताधिकारी यांना पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
www.konkantoday.com