
उकाड्यापासून सुटका होणार, मान्सून अंदमानात या दिवशी धडकणार
उष्णतेच्या लाटेने होरपळणाऱ्या नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, यंदा मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान निकोबार बेटांच्या परिसरात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. सामान्यतः मान्सून 20 मेच्या सुमारास अंदमानात दाखल होतो. पण यंदाची स्थिती पाहता, पाऊस नेहमीच्या वेळेपेक्षा 5 ते 6 दिवस आधीच अंदमानात धडक देऊ शकतो. यामुळे यंदा मुख्य भूभागावरही मान्सून वेळेवर किंवा लवकर पोहोचण्याची आशा निर्माण झाली आहे.
‘या’ राज्यांमध्ये पावसाचा इशारा
अंदमानात मान्सून दाखल होत असतानाच दक्षिण भारतातही पावसाचा अंदाज वर्तवला जातो. पुढील चार ते पाच दिवस दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.




