राजापूर शहरातील एक युवक गेली ६ वर्षे जवाहर चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची करतोय नियमित पूजा


छ.शिवाजी महाराजांच्या स्मारकाची नियमित पूजा करणारा अवलिया
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी दिलेले योगदान आजही आदर्शवत आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आजही जनतेच्या मनामनात भरून आहेत. त्यांच्यासाठी काहीही करण्याची वृत्ती आजच्या तरूण पिढीमध्येही दिसून येत आहे. म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांकडे दैवत म्हणून पाहिले जात आहे. आणि दैवताची नियमित पुजा करून राजापूर शहरातील एक युवक गेली ६ वर्षे नियमित जवाहर चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पूजा करत आहे. या युवकाचे नाव आहे कृष्णा उर्फ पांड्या करंबेळकर, पाऊस, थंडीची तमा न बाळगता निस्वार्थी भावनेने करीत असलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button