मोरवणे गावचे सुपुत्र मेजर अंकुश शिंदे यांचे निधन
मोरवणे (ता.चिपळूण) गावचे सुपुत्र दानशूर व्यक्तीमत्व मेजर अंकुश शिंदे (७३) यांचे नुकतेच पुणे येथील त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.
शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण केंद्रीय विद्यालय कुलाबा तसेच माध्यमिक शिक्षण सेंट पोल हायस्कूल बेळगाव येथे झाले. त्यांचे वडील कै. लेफ्टनंट राजारामराव हे भारतीय सैन्यदलात असल्यामुळे त्यांनी मोठे चिरंजीव अंकुश यांना मराठा सेंटर बॉईज हॉस्टेल, बेळगाव येथे १९६६ ते १९६८ या दोन वर्षासाठी सैनिकी शिक्षण घेण्यासाठी दाखल केले. आणि त्याचवेळी ते मॅट्रिकची परीक्षा प्रथम श्रेणी घेवून उत्तीर्ण झाले. वडिलांच्या मागे आपणही सैन्यात जावून देशसेवा करावी या उद्देशाने ते १९६९ साली मराठा लाईट इन्फ्रंट्री बेळगाव येथे सोल्जर म्हणून भरती झाले.
www.konkantoday.com