
*संजय राऊत यांना कोर्टाने फटकारले, वायफळ बडबड करण्यापेक्षा पुरावे द्या*
संजय राऊत अडचणीत आले आहे. गिरणा कारखान्यात मंत्री दादा भुसे यांच्यावर त्यांनी १७८ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. प्रकरणात २ डिसेंबरला संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन दिला होता. परंतु आज ३ फेब्रुवारी रोजी संजय राऊत नियमित सुनावणीसाठी हजर झाले नाही. त्यानंतर न्यायालयाने त्यांना चांगलेच फटकारले. वायफळ बडबड करण्यापेक्षा पुरावे द्या, असे कोर्टाने त्यांना बजावले.मालेगाव न्यायालयात खासदार संजय राऊत यांच्यावर दाखल केलेल्या मानहानी दाव्याची सुनावणी आज होती. परंतु या सुनावणीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत गैरहजर राहिले. परंतु मंत्री भुसे यांनी न्यायालयात हजर राहून साक्ष नोंदविली. राऊत गैरहजर राहिल्यामुळे कोर्टाने नाराजी व्यक्त केली. राऊत यांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा पुरावे सादर करावे, या शब्दांत न्यायालयाने वकिलामार्फत राऊतांना सुनावले.www.konkantoday.com