शासन सध्या गरीबांना मारक धोरण आणत आहे, शासनाच्या चुकीच्या निर्णयांविरोधात जनआंदोलन उभारणार
शासन सध्या गरीबांना मारक असे धोरण आणत आहे. त्यामुळे कंत्राटी भरती, सरकारी शाळा बंद अशा अनेक चुकीच्या निर्णयाविरोधात जिल्ह्यातच नव्हे तर कोकणात जनआंदोलन उभारण्याचा इशारा जन हक्क संघर्ष समितीचे शीलभद्र जाधव यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी १ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, संघटनेचे सर्वसामान्यांना जगण्यासह शिक्षण व अन्य बरेच अधिकार दिले आहेत. मात्र सध्याचे केंद्र व राज्य सरकार मनमानी कारभार करीत त्यांच्या न्याय हक्कांवर गदा आणत आहे. गरीबांची मुले शिकूच नयेत, असे शासनाला वाटत आहे. त्यामुळे १८ नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयाने राज्यातील ६५ हजार शाळा दत्तक शाळा योजनेंतर्गत खाजगीकरण करण्याचे ठरवले आहे. तसेच २१ सप्टेंबरला २० विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असणार्या जिल्हा परिषद, नगर परिषद मालकीच्या १४ हजार ७८३ शाळा बंंद करून समूहशाळा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सर्वाधिक फटका कोकणला बसणार आहे.
www.konkantoday.com