रत्नागिरी शहरातील जिल्हा परिषद जवळील शंखेश्वर पार्कमध्ये दाम्पत्याने तरुणीच्या घरात घुसून तिच्या वडिलांशी वाद करत तिला मारहाण करण्याचा प्रकार
रत्नागिरी शहरातील जिल्हा परिषद जवळील शंखेश्वर पार्कमध्ये दाम्पत्याने तरुणीच्या घरात घुसून तिच्या वडिलांशी वाद करत तिला मारहाण केली.ही घटना शनिवार 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वा.घडली असून याबाबत शहर पोलिस ठाण्यात दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी शहरात जिल्हा परिषद कार्यालय मार्गावर असलेल्या अपार्टमेंट मधील एका फ्लॅटमध्ये जोरदार राडा झाला आहे. २१ वर्षीय युवती आणि तिचे आई-वडील हे घरात राहतात. त्यांच्या घरात घुसून जोरदार मारहाण करण्याचा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या मारहाणीत सिमरन संजय नलावडे ही युवती जखमी झाली आहे. “मी दगडी चाळीतून आलो आहे”, अशी धमकी देत मारहाण झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रत्नागिरी शहरातील जिल्हा परिषद जवळ असलेल्या शंखेश्वर अपार्टमेंट डी २२ या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला आहे.
या प्रकरणी फिर्यादी असलेल्या सिमरन आणि त्यांचे आई-वडील घरी होते. यावेळी त्यांच्याच बिल्डींगमध्ये राहणारे रसिका समीर रहाटे आणि समीर रहाटे यांनी सिमरन यांच्या घरात घुसून त्यांच्या वडिलांना ”तू माझ्या मुलाला किडनॅप करतोस का?”, असे बोलून सिमरन आणि त्यांच्या वडिलांशी जोरदार शाब्दिक बाचाबाची करत वाद केला. याचवेळी रसिका रहाटे यांनी सिमरन यांच्या अंगावर धावून गेल्या आणि हाताच्या नखांनी फिर्यादी यांच्या गळ्याजवळ ओरबाडीन जोरदार मारहाण केली. तसेच रसिका यांच्याबरोबर आलेले समीर रहाटे यांनी फिर्यादी सिमरन यांचे केस ओढून त्यांचे डोके भिंतीवर आपटले. इतकेच नव्हे तर त्यांना ”मी दगडी चाळीतून आलो आहे. तुम्हाला चांगलाच धडा शिकवेन”, अशी धमकी देत मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com