भरणे जगबुडी पुलावर कंटेनर आदळून चालक गंभीररित्या जखमी


मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे जगबुडी पुलावरील दुभाजकावर शुक्रवारी सकाळच्या सुमारास मालवाहू कंटेनर आदळून अपघात घडला. या अपघातात कंटेनर चालक गंभीररित्या जखमी झाला. उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
कंटेनर चालक कंटेनरमधून (जी.जे. १२/बी.एक्स ६६६७) लोखंडी पाईप घेवून मुंबई येथून गोव्याच्या दिशेने जात होता. तो भरणे जगबुडी पुलानजिक आला असता नियंत्रण सुटल्याने कंटेनर पुलावरील दुभाजकावर आदळला. अपघातानंतर कंटेनरच्या मागील ४ लोखंडी पाईप थेट जगबुडी नदीपात्रात कोसळले. पुलावरील मध्यभागीच कंटेनर आडवा झाल्याने वाहतूकही ठप्प झाली. अपघाताचे वृत्त कळताच स्थानिकक पोलीस घटनास्थळी पोहोचले. पुलाच्या एका बाजूला बॅरिकेटस उभे करून एकेरी वाहतुकीचा अवलंब करण्यात आला. जगबुडी पुलावर अवजड वाहनाचा पहिलाच अपघात घडला. या अपघातामुळे पुलाची संरक्षक भिंतही कमकुवत झाल्याने धोका निर्माण झाला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button