
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा रुग्णालयात फळ वाटप
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे सेवा उपक्रमांतर्गत रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व राष्ट्रहितासाठी अखंड सेवा यासाठी शुभेच्छा देत भाजप कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांमध्ये फळांचे वाटप केले.
या उपक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे, शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, सेवा पंधरवडा संयोजक संतोष सावंत, राजू भाटलेकर, पुंडलिक पावसकर, प्रशांत डिंगणकर, मनोज पाटणकर, नितीन जाधव, अमित विलणकर, अशोक वाडेकर, विक्रम जैन, संदीप सुर्वे (नाचणे), राजन फाळके, नितीन गांगण, शैलेश बेर्डे, रामा शेलटकर, सचिन गांधी, मंदार भोळे, श्रीकांत सरदेसाई, संदीप रसाळ, विजय माळवदे, प्रशांत घाणेकर, ऋषिकेश केळकर, समीर वस्ता, निलेश आखाडे, मन्सूर मुकादम, प्रवीण रायकर, तुषार देसाई शोएब खान आदी मान्यवर उपस्थित होते.
महिला मोर्चाच्या सौ. सुप्रिया, सौ. प्रणाली रायकर, सौ. संगीता कवितके, सौ. शोनाली आंबेरकर, सौ. संपदा तळेकर, सौ. भक्ती दळी, सौ. कामना बेग, सौ. सायली बेर्डे, सौ. सोनाली केसरकर, सौ. प्रज्ञा टाकळे, सौ. अनुष्का शेलार सारिका शर्मा पदाधिकारी व कार्यकर्त्या महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला.




