
चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली घाट येथे जखमी अवस्थेमध्ये सापडलेल्या सांबराच्या पिल्लावर उपचार करून त्याला वन विभागाने जीवनदान दिले
कुंभार्ली घाट येथे जखमी अवस्थेमध्ये सापडलेल्या सांबराच्या पिल्लावर उपचार करून त्याला वन विभागाने जीवनदान दिले आहे.चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली घाट येथे जखमी अवस्थेमध्ये सांबर जातीचे पिल्लू असल्याची माहिती २० ऑक्टोबर रोजी घाटमाथा येथील पोलीस चौकीतील कर्मचारी श्री.इम्पाल यांनी दुरध्वनीव्दारे वन विभागाला दिली. कळविलेल्या माहितीचे अनुषंगाने वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहचून सदर जखमी सांबर जातीच्या पिल्लांस वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत सुरक्षीतरित्या ताब्यास घेवून सांबर जातीच्या पिल्लाची पाहणी केली असता त्याचा डाव्या पायाच्या मांडीवरती जखम दिसून आली.पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. श्री. कानसे यांजकडून औषध उपचार करुन ती सुरक्षित असल्याची खात्रीकरून दि. २१/१०/२०२३ रोजी नैसर्गिक अधिवासात सुखरुप सोडून देण्यात आले. या बचावकार्यात श्री. राहूल गुंठे वनरक्षक कोळकेवाडी, श्री. निलेश बापट, मानद वन्यजीव रक्षक, व श्री.नंदकुमार कदम, वहानचालक यांनी सांबर जातीच्या पिल्लास ताब्यात घेवून नैसर्गिक अधिवासात सोडले.
www.konkantoday.com