
खेडमध्ये अत्याधुनिक रूग्णवाहिका सडताहेत
खेड शहरातील रूग्णांना तातडीने उपचार मिळावेत याकरिता नगरपरिषदेला ६० लाख रूपये किंमतीच्या दोन अत्याधुनिक कार्डियाक रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र वर्षभरापासून दोन्ही रूग्णवाहिका महाडनाका येथील नगरपरिषदेच्या अग्निशामक केंद्राच्या आवारात जागेवरच उभ्या असल्याने सडत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. वर्षभरापासून दोन्ही रूग्णवाहिकांची पासिंगच न केल्याने करारावर दिलेल्या दोन्ही रूग्णवाहिका सेवाभावी संस्थांनी नगरपरिषदेच्या ताब्यात दिल्याची माहिती उघड झाली आहे.
कोरोनाच्या संकटात शहरातील रूग्णांच्या तातडीच्या उपचारासह त्यांच्या खर्च व वेळेची बचत करण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ बुटाला यांनी बंधन बँकेच्या माध्यमातून ४० लाख रुपये किंमतीची सर्वसोयी सुविधांनी युक्त एम.एच. ०८ ए.पी. ३३६० क्रमांकाची एक कार्डियाक रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून २० लाख रुपये किंमतीची एम.एच. ०६ बी. डब्लू ४८९५ क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली.