
चिपळूण शहरातील एका इमारतीमध्ये गांजा फुंकणारे चार तरुण पोलिसांच्या ताब्यात .
*चिपळूण शहरातील एका इमारतीमध्ये गांजा फुंकणारे चार तरुण बुधवारी पोलिसांच्या आयतेच ताब्यात सापडले. नशेत तर्रर्र असलेल्या या गांजाडी तरुणांनी आम्हाला शहरातील एक बॉडीबिल्डर अंमली पदार्थ पुरवतो, अशी पोलिसांकडे कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे.
गेले काही दिवस हे तरुण विरेश्वर तलाव परिसरातील एका बंद इमारतीमध्ये आपली तलफ भागविण्यासाठी येत होते. याची कुणकुण आजूबाजूच्या नागरिकांना लागताच त्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. आजही हे तरुण नेहमीच्या स्टाईलमध्ये इमारतीमध्ये शिरले आणि गांजाची नशा करू लागले. ते आल्याचे समजताच पाळत ठेवलेल्या नागरिकांनी पोलिसांसह तिथे धाव घेत त्यांना रंगेहाथ पकडले.
www.konkantoday.com