रत्नागिरी शहर कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षपदी इरफान होडेकर
रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेस उपाध्यक्ष व रत्नागिरी चे प्रभारी हारीस शेकासन व शहराध्यक्ष रमेश शाहा यांच्या हस्ते रत्नागिरी शहर कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष पदाच्या नियुक्तीचे पत्र इरफान होडेकर याना देण्यात आले.
नुकतीच जिल्हा कॉंग्रेस अल्पसंख्यक विभाग अध्यक्ष खलिल सुर्वे यांनी इरफान होडेकर यांची या पदावर नियुक्ती जाहीर केली होती.
यावेळी अश्फाक झारी, नदीम मुजावर, शुक्रन हकीम, उमानाथ सुर्वे,फहिम फणसोपकर, तन्वीर इनामदार आदि उपस्थित होते.