
मंत्री उदय सामंत यांचे हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा भव्य सन्मान
खेड (प्रतिनिधी )* कोकणचा सन्मान सामाजिक संस्था रत्नागिरी, या संस्थेच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार या पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान राज्याचे उधोग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे हस्ते रत्नागिरी शहरातील मराठा हॉल येथे करण्यात आला. यावेळी बहुसंख्याने मान्यवरांची उपस्थिती होती खेड संगलट येथील ज्येष्ठ व अभ्यासू पत्रकार इक्बाल जमादार, यांना आदर्श पत्रकार, दापोली कोंढे येथील प्रवीण रामचंद्र शिंदे यांना समाजभूषण, खेड येथील रफिक अब्दुल रहेमान कौचाली यांना आदर्श उधोजक तसेच , संगलट येथील मुजीब अली नाडकर यांना आदर्श समाजसेवक हे पुरस्कार सामंत यांचे हस्ते देण्यात आले.या संस्थेने राज्यातील आणि रत्नागिरी जिल्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पंचावन लोकांना हे पुरस्कार दिले.समाजात उल्लेखनीय कामगिरी करणार्याचा सन्मान हा झाला पाहिजे या साठी ही संस्था खऱ्या अर्थाने चांगले काम करत आहे अशी प्रशोंशा ना.सामंत यांनी केली. दरवर्षी राज्यशासन अनेक लोक उपयोगी कल्याणकारी योजना राबवत आहे.या योजना आशा सामाजिक संस्थांचे माध्यमातून लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत.जेणेकरून त्याचा लाभ हा प्रत्येक गरजू लोकांपर्यंत पोहचेल असेही सामंत म्हणाले.