मच्छिमारांचा इंधनावरील खर्च कमी व्हावा यासाठी मासेमारी नौकांवर पर्यायी इंधन चाचण्या यशस्वी

मच्छिमारांचा इंधनावरील खर्च कमी व्हावा तसेच सागरी पर्यावरणाचे संतुलन रहावे, या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने २०१६ पासून मत्स्य व्यवसायात पर्यायी इंधनाबाबत संशोधन सुरू केले होते. पर्यायी इंधनामध्ये एलपीजी, सीएनजी, इथेनोल, मिथेनॉल अशा विविध पर्यांयांचा समावेश आहे. यापैकी एलपीजी म्हणजेच गॅसवर चालणार्‍या नौका इंजिनची (आऊट बोट मशीन) चाचणी नुकतीच मालवण व देवगड येथे घेतली गेली. दोन्ही ठिकाणच्या चाचण्या यशस्वी झाल्या.
लवकरच सद्यस्थितीत वापरत असलेल्या पेट्रोल अथवा केरोसीन इंजिनचे रूपांतर एलपीजी तसेच सीएनजीमध्ये करण्यासाठीचे तंत्रज्ञान सर्वसामान्य मच्छिमाराला कमीत कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. या चाचण्या राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाने आयोजित केल्या होत्या, अशी माहिती राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, नॅशनल फिश वर्कर्स फोरमच्या रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी दिली.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button