माजी खासदार निलेश राणे सक्रिय राजकारणाला कंटाळले ,राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा


भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी दसऱ्याच्या दिवशीच मोठा निर्णय घेतला आहे. निलेश राणे यांनी अचानक राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे.सोशल मीडिया पोस्ट करुन त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राजकारणात मन रमत नसल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कळत नकळत काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल दिलगिरी देखील निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे. निलेश राणे यांच्या सोशल मीडिया पोस्टवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे
निलेश राणे यांची पोस्ट

‘नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे.’
‘BJPमध्ये खूप प्रेम मिळालं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे. मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन.’
निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!’
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button