
मंडणगडात ई-केवायसीचे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता आणि राज्य शासनाच्या नमो योजनेचा पहिला हप्ता घेण्यासाठी मंडणगड तालुक्यातील ५१६ शेतकर्यांची ई केवायसी आणि आधार जोडणी करण्यासाठी ९०९ शेतकरी प्रलंबित आहेत. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मुंबई, पुण्याहून गणपती उत्सवाकरता गावाकडे येणार्या चाकरमान्यांनी केवायसी व जोडणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्रीमती सुप्रिया घोडके यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत शेतकर्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये दिले जात आहेत. त्यासाठी ई केवायसी आणि आधार जोडणी अत्यावश्यक आहे. बाहेरगावी असल्यास लाभार्थी यांचे मोबाईल नंबर वारंवार बदलत असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होत नाही. बँक खात्यासाठी जोडलेले नंबरही चुकीचे असतात. कृषी विभागाकडून राबवण्यात आलेल्या मोहिमेत मंडणगडमध्ये ५९५३ शेतकर्यांची केवायसी करण्याचे लक्ष्य होते. त्यातील ५४७७ शेतकर्यांच्या नोंदी पूर्ण झाल्या असून ९१ टक्क काम पूर्ण झाले आहे.
www.konkantoday.com