
पोक्सोंतर्गत शिक्षा झाल्याने प्रौढाची आत्महत्या
दापोली तालुक्यातील आंजर्ले ताडाचा कोंड येथे राहणार्या प्रवीण भोसले या ५० वर्षीय प्रौढाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवार २१ ऑक्टोबर रोजी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रवीण भोसले याला खेड सेशन कोर्टात पोक्सो अंतर्गत १८ महिने कारावास व ५ हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास ३ महिन्यांची शिक्षा झाली होती. शिक्षा झाल्याने त्या तणावामध्ये प्रवीण याने घराच्या पोटमाळ्यावर वाशाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. याची खबर सुरेश म्हादलेकर (रा. आंजर्ले) यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली. www.konkantoday.com