
लांजा ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन
गेली अनेक वर्षे रखडलेल्या लांजा ग्रामीण रूग्णालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन अखेर राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते २२ ऑक्टोबर रोजी पार पडले. त्यानंतर लांजा तालुका शिवसेना (शिंदे) गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला.
लांजा ग्रामीण रूग्णालयाची इमारत ही जीर्ण झाली असून या ठिकाणी अद्ययावत आणि सुसज्ज इमारत बांधण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून लांजा तालुक्यातील जनतेतून सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर लांजा ग्रामीण रूग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून झाले. भूमिपूजन समारंभास मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर बर्गे, उपसंचालक डॉ. प्रेमचंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, सार्वजनिकक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत, तालुकाध्यक्ष गुरूप्रसाद देसाई, जयवंत शेट्ये आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com