ठाकरे ब्रॅन्ड वाचवा खेडमध्ये चक्क मनसेचे ठाकरे ब्रॅन्ड वाचवा पोस्टर्सने सर्वांचे लक्ष वेधले

शिवसेना भाजपसोबत सत्तेत बसणार? की सत्तेतून बाहेर जाणार की सरकार वाचविणार या अशा अनेक प्रश्नांसोबतच सध्या महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली, रस्त्त्यारस्त्यावर आणि नाक्या-नाक्यावर चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रातला राजकीय भूकंप आणि त्याचे पडसाद उमटत असताना काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात तर काही ठिकाणी शिवसेनेच्या समर्थनात बॅनर लागल्याचं दिसून आलंया सगळ्या राजकीय घडामोडींत आता कोकणातून एका बॅनरने सगळ्यांचं लक्ष वेधलंय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे बॅनर ना शिवसेनेनं लावलं आणि नाही एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी. हे बॅनर चक्क मनसेकडून लावण्यात आलं आहे. मनसेचे सरचिटणीस असलेल्या वैभव खेडेकर यांनी हा बॅनर लावलाय.कोकणची भूमी निष्ठावंतांची, गद्दारांना ठोका, ठाकरे ब्रँड वाचवा, अशा आशयाचा एक बॅनर सध्या चर्चेत आलाय. या बॅनरने रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांचं लक्ष वेधलंय. मनसेचे वैभव खेडेकर यांनी हे बॅनर लावलंय. खेडमधील या बॅनरवर राज ठाकरेंचाही फोटो लावण्यात आला आहे. कोकणची भूमी निष्ठावंतांची, गद्दारांना ठोका, असं सफेद अक्षरांत लिहिलं गेलंय. तर ठाकरे ब्रँड वाचवा असं, ठळक भगव्या अक्षरांत लिहिलं गेलंय. हा बॅनर सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय.आता हा ठाकरे ब्रॅण्ड वाचवा म्हणून लावण्यात आले आहे की नेहमी प्रतिस्पर्धी राहिलेले खेडचे आमदार योगेश कदम हे शिंदे गटाबरोबर गेल्यावर त्यानं डिचवण्यासाठी हे बॅनर लावण्यात आले आहे याची चर्चा सुरू आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button