
म्यानमार-नेपाळसहीत जम्मू-काश्मीरमला भूकंपाचे धक्के
म्यानमार-नेपाळसहीत जम्मू-काश्मीरमला भूकंपाचे धक्के बसले आहेत. मागील 12 तासांमध्ये जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. आज पहाटे 6 वाजता म्यानमारला भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाची रिश्टर स्केलवरील तिव्रता 4.3 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू पृष्ठभागाखाली 90 किलोमीटर खोलीवर म्यानमारमध्येच होता अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. मिझोरममध्ये रविवारी-सोमवारी मध्यरात्रीनंतर 2 वाजून 9 मिनिटांनी 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू मिझोरमची राजधानी आइजवाल शहराच्या पृष्ठभागाखाली 20 किलोमीटरवर होता. हे भूकंपाचे धक्के म्हणजे आफ्टर इफेक्ट असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र वारंवार येणाऱ्या या भूकंपांमुळे मोठा भूकंप होणार की काय अशी भीत सर्वसमान्यांना वाटत आहे.
www.konkantoday.com