
एसबीआयची मेसेजची लिंक देण्याच्या बहाण्याने खेडमधील इसमाची ३ लाख ५० हजाराची अज्ञाताने केली ऑनलाईन फसवणूक
खेड सवेणी येथील राहणारे फिर्यादी फईम चिपळूणकर यांना स्टेट बँक बँकेची एसएमएसची लिंक मिळवून देतो असे सांगून त्या बहाण्याने अज्ञात इसमाने त्यांच्याकडून बँक डिटेल घेऊन त्यांच्या खात्यातील तीन लाख पन्नास हजार रूपये काढून घेण्याचा प्रकार घडला आहे
येथील फिर्यादी यांना स्टेट बँकेच्या एसएमएस सेवेची आवश्यकता असल्याने त्याने कस्टमर केअर सेंटरला फोन केला परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर थोडावेळाने त्यांच्या मोबाइलवर अनोळखी इसमाचा फोन आला त्याने फिर्यादी याला हिंदीतून आपल्याला सेवेसाठी मदत पाहिजे अशी विचारणा करून त्यांना लिंक पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला त्यानंतर आपल्या एनिडेक्स अॅप्लिकेशनवर लोड करून लिंकमध्ये मागवलेली माहिती फिर्यादी यांच्याकडून भरून घेतली त्यानंतर फिर्यादी यांच्या खेडमधील स्टेट बँकेच्या खात्यामधील असलेली तीन लाख पन्नास हजार रुपयांची रक्कम अज्ञात इसमाने ऑनलाईन द्वारे टप्प्याटप्प्याने काढून घेतली हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी खेड पोलीस स्टेशनला खरी फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com