जिल्हास्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा रत्नागिरी येथे संपन्न
रत्नागिरी
जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी गुरूकृपा मंगल कार्यालय रत्नागिरी येथे उत्साही वातावरणात पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन कुस्ती संघटनेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर केळकर यांच्या हस्ते झाले.
या कुस्ती स्पर्धेत 80 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कुमारगट मुले-मुली,प्रौढ महिला गट, पुरूष वरिष्ठ गट व ग्रिको रोमन अशा गटात ही स्पर्धा घेण्यात आली. डाव प्रतिडावानी उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या स्पर्धेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी संघ निवडण्यात आला.
रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली होती. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भाई विलणकर, सदानंद जोशी, चंद्रशेखर केळकर, अमित विलणकर, संतोष कदम, आनंद तापेकर, वैभव चव्हाण, फैयाज खतीब, अंकुश कांबळे, योगेश हार्चेकर, आनंदा सलगर आदींनी विशेष प्रयत्न केला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे (पुरूष प्रौढ गट)-भावेश प्रमोद सावंत, साहिल सुनिल धांगडे, अतुल अरूण गराटे, सोहम प्रभाकर थरवळ, प्रथमेश महादेव कुळ्ये, रोहित राजेश चिले, अर्थव रूपेश घोले, योगेश विजय हरचेकर, साहिल संतोष खटकुल, तेज प्रदिप जावळे, ऋषिकेश रमाकांत शिवगण, आनंद श्रीपती तापेकर, सैफुदिन हुसैन पठाण, संस्कार सुहास लटके, पवन अमित साळुंखे यांची निवड धाराशीव येथे होणार्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी करण्यात आली.
www.konkantoday.com