
२९ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी येथे होणाऱ्या रोलर कोस्टर सायक्लोथॉन ची रत्नागिरी सायकलिस्ट क्लब तर्फे जय्यत तयारीदेशभरातून सायकलप्रेमी येणार रत्नागिरीमध्ये
रत्नागिरीची ओळख सायकल डिस्ट्रिक्ट ऑफ इंडिया व्हावी, उत्तमोत्तम सायकलपटू तयार व्हावेत, ऑलिम्पिक ,कॉमनवेल्थ किंवा आशियाई गेम्स सारख्या खेळात सायकलिंग मध्ये भारताने पदकांची लयलूट करावी आणि त्याचबरोबरीने सायकल टुरिझम वाढून सायकलचा उपयोग अर्थार्जनासाठी व्हावा या सुहेतूने कोकणातील दोनशेहून अधिक सदस्यसंख्या असलेला रत्नागिरी सायकलिस्ट क्लब स्थापनेपासूनच कार्यरत आहे.
स्थानिक पातळीवर जवळपास पंचवीस पेक्षा जास्त उपक्रम घेतलेल्या या क्लब ने “रोलर कोस्टर सायक्लोथॉन पॉवर्ड बाय हॉटेल विवेक” च्या माध्यमातून आपले पुढचे पाऊल उचलले आहे.
२ वर्षापूर्वी १७-१८ सायकलप्रेमींपासून सुरु झालेला हा समूह २०० हून अधिक सायकलप्रेमींपर्यंत पोचला आहे.
भाट्ये-गावखडी -भाट्ये दरम्यान होणाऱ्या या ४८ किमी च्या सायकल स्पर्धेमध्ये भारतभरातून जवळपास १७५ पेक्षा जास्त सायकलपटू सहभागी झाले आहेत. सर्व स्पर्धकांची राहायची तसेच जेवण व नाश्त्याची व्यवस्था हॉटेल विवेक च्या माध्यमातून करण्यात आली आहे त्याचप्रमाणे जय हनुमान मित्र मंडळ, आरडीसीसी बँक, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी,हिंद सायकल मार्ट,नंदाई डिजिटल मार्केटिंग, सुवर्णसूर्य फाउंडेशन,आनंदकल्प हॉस्पिटल,श्री विनय रेवडेकर, हॉटेल अलंकार, हॉटेल ब्ल्यू व्यू, श्री राजू घाग , रत्नदुर्ग माउंटेनिअरिंग,वॉकर्स ग्रुप, SHIEMVOLTECH प्रायव्हेट लिमिटेड , हॉटेल मिथिला,कवडे हेल्थ क्लिनिक,फ्लेवर्स बेकरी,श्री दीपक पवार यासारख्या प्रयोजकांनी या स्पर्धेला उचलून धरल्यामुळे खऱ्या अर्थाने ही स्पर्धा क्लबपुरती मर्यादित न राहता समस्त रत्नागिरीकरांची झाली आहे.
पुरुष ओपन, महिला ओपन, पुरुष ४० ते ५५ आणि पुरुष ५५+ या ४ गटांमध्ये ही स्पर्धा होणार असून जवळपास एक लाख रुपयांची बक्षिसे तसेच आकर्षक चषक विजेत्यांना दिले जाणार आहेत.
याचवेळी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब मधील यशवंत ट्रिपल एसआर एसआर अमित कवितके, एसआर शुभम शिवलकर,एसआर अमित पोटफोडे, एसआर अनुप मेहेंदळे, एसआर महेश(बॉबी) सावंत, एसआर ओंकार फडके, एसआर यतीन धुरत, एसआर डॉक्टर नितीन सनगर, एसआर तृणाल येरुणकर तसेच विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या क्लब मधील सायकलिस्ट ना देखील सन्मानित केले जाणार आहे. रेस अक्रोस अमेरिका स्पर्धेचे विजेते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आणि पंतप्रधानांनी मन किती बात कार्यक्रमात गौरवलेले नाशिक येथील डॉक्टर महेंद्र महाजन हे या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती रत्नागिरी सायकलिस्ट क्लब तर्फे देण्यात आली. हॉटेल विवेक इथे झालेल्या या पत्रकारपरिषदेला वर उल्लेखलेले सर्व सत्कारमूर्ती तसेच रत्नागिरी सायकलिस्ट क्लब चे दर्शन जाधव, सचिन नाचणकर, विनायक पावसकर,, डॉक्टर राज कवडे, प्रसाद देवस्थळी,सुहास ठाकूरदेसाई, केदार देवस्थळी, धीरज पाटकर, योगेश मोरे उपस्थित होते.
सर्व रत्नागिरीकरानी या सायकल स्पर्धेचा थरार अनुभण्यासाठी २९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ५:३० वाजता भाट्ये इथे उपस्थित रहावे असे आवाहन रत्नागिरी सायकलिस्ट क्लब तर्फे करण्यात आले आहे.
www.konkantoday.com