सिंधुदुर्ग जिल्ह्यात मसुरे मार्गाचीतड येथे विहिरीत पडून सुमारे १४ रानडुक्करांच्या पिल्लांचा मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मसुरे मार्गाचीतड येथील जमिनीलगत असलेल्या विहिरीत पडून सुमारे १४ रानडुक्करांच्या पिल्लांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. आठ दिवसांनंतर विहिरीमध्ये दुर्गंधी सुटल्याने ग्रामस्थांनी पाहिले असता सदर घटना निदर्शनास आली.याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, मालवण वनपाल श्रीकृष्ण परीट यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृत डुक्करांचे वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्याने त्याच विहिरीत दफन केले.मसुरे मार्गाचीतड येथील सुषमा परब आणि कुटुंबियांच्या मालकीच्या जमिनीत कठडा नसलेली वापर नसलेली विहीर आहे. सुमारे आठ दिवसांपूर्वी या विहिरी नजीक काही तरी पडल्याचा आवाज आला होता. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याने या विहिरीतून दुर्गंधी येऊ लागल्या नंतर विहिरीत डोकावून पहिल्यानंतर सर्व रानडुक्करे मृत झालेली दिसून आली. याबाबत अशोक सांडव यांनी वनविभागाला कळविले. वनविभागाचे वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी वैधकीय अधिकारी यांच्यासह पाहणी करून सर्व डुकर मृत झाल्याने जमीन मालकांच्या परवानगीने या विहिरीत वडाचापाट येथील उद्योजक दया देसाई यांच्या जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून सर्व डुकरांचे दफन केले.
www.konkantoday.com