पाचल परिसरात विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा
राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात विना परवाना दुचाकी चालविणार्या शाळकरी विद्यार्थ्यांवर रायपाटण पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून परिसरातून या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
पाचल परिसरातील तेराशेच्या जवळपास विद्यार्थी शिकत असलेल्या सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल हायस्कूलमधील काही विना लायसन्स दुचाकी चालवणार्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी वारंवार सूचना देवून सुद्धा विना लायसन्स दुचाकी चालवत असल्याच्या वारंवार तक्रारी येत असल्याने अशा विद्यार्थ्यांवर शुक्रवारी राजापूर पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रायपाटण पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल भिम कोळी, स्वप्नील घाडगे, रामदास पाटील यांनी समज देवून कारवाई केली.
www.konkantoday.com