जाळे ओढताना बोटीवर आदळून खलाशाचा मृत्यू
गणपतीपुळे येथील समुद्रात मासेमारी करताना जाळे ओढताना बोटीवर आदळून खलाशाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास घडली. रामबहाद्दूर चौधरी (५५, रा. मिरकरवाडा) असे मृत खलाशाचे नाव आहे.
मिरकरवाडा येथील अमीन हंसला या बोटीवरील खलाशी हे गणपतीपुळे येथील समुद्रात पहाटे ४ च्या सुमारास मासेमारीसाठी गेले होते. गणपतीपुळे समुद्रात असताना मासे मिळाल्यानंतर बोटीवरील समुद्रातील जाळ्याचे दोर खलाशांसह रामबहाद्दूर ओढत असताना अचानक दोर तुटला व रामबहाद्दूर बोटीवर आपटला. त्याच्या डोके व कपाळावर गंभीर दुखापत झाली. तत्काळ खलाशांनी उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. www.konkantoday.com