आंबा शेतक-यांना पुढील हंगामासाठी खते,औषधे खरेदीसाठी पैशांची आवश्यकता
रत्नागिरी जिल्हयामध्ये फलोत्पादन व रोजगार हमी योजनेतून लागवड योजना लागू झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर आंबा,काजू या खरीप हंगामातील नगदी पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रांमध्ये मोठी वाढ झालेली आहेत्यामुळे फळधारणा होणा-या या फळपिक झाडांच्या हवामानावर आधारीत विमा योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना आर्थिक नुकसानीची झळ बसून पुर्णतः नुकसान होऊ नये म्हणून विम्याचा लाभ दिला जातो. यामध्ये यावर्षीच्या आंबा हंगामामध्ये ज्या बागायतदार शेतक-यांनी फळपिक विमा काढलेला होता त्यानुसार त्यांना विमाछत्र असणा-या कालावधीत अनेक वातावरणीय बदल, पाऊस याचा परिणाम होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने फळधारणा अत्यल्प झाली होती त्यामूळे आता हंगाम संपून सहा महिने झाले तरीही विमा कंपनीकडून कोणत्याही प्रकारे नुकसानीची टक्केवारी वा अन्य माहिती व विमा रक्कमे विषयीची माहिती दिलेली नसल्याने आता शेतक-यांना पुढील हंगामासाठी खते,औषधे खरेदीसाठी पैशांची आवश्यकता असल्याने विमा रक्कम तातडीने मिळण्याची गरज आहे.
www.konkantoday.com