खेडचे तत्कालीन नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल


येथील नगरपरिषदेच्या ठरावातील मुळ मजकुरात बदल करुन महत्वाच्या तपशीलाव्यतिरिक्त अधिकच्या मजुकराची नोंद घेत खोटा दस्त ऐवज तयार केला. याप्रकरणी खेडचे तत्कालीन नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणी खेड नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या आदेशानुसार कर्मचारी रूपेश एकनाथ डंबे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
खेड नगरपरिषदेत डिसेंबर २०१६ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत नगराध्यक्ष असताना मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी नगरपरिषदेच्या ठरावातील मूळ मजकुरात असलेला महत्वाच्या तपशीला व्यतिरिक्त अधिकच्या मजुकराची नोंद घेवून खोटा दस्त ऐवज तयार केला. हा दस्तऐवज खरा असल्याचे भासविले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी वैभव खेडेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button