वीज कंत्राटी कामगार संघाचा १ नोव्हेंबर रोजी मोर्चा
वीज कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहीत रोजंदारी पद्धतीने (एनएमआर) वयाच्या ६० वर्षापर्यंत जॉब सिक्युरिटी देवून सेवेत कायम सामावून घ्यावे किंवा समान कम समान वेतन द्यावे, या प्रलंबित मागण्यांसाठी वीज कंत्राटी कामगार संघ यांच्यावतीने १ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांनी एकजुटीने त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जयेंद्र थुळ आणि सरचिटणीस धनंजय चव्हाण यांनी केले आहे.
महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील नियमित रिक्त पदांवर मागील १५ ते २० वर्षापासून फक्त १४ हजार, १५ हजार रु. प्रतिमहा काम करत आहेत. या कामगारांना कंत्राटदार विरहित रोजंदार पद्धतीने (एनएमआर) वयाच्या ६० वर्षापार्यंत जॉब सिक्युरिटी देवून सेवेत कायम सामावून घ्यावे किंवा समान कम समान वेतन द्यावे, या प्रलंबित मागण्यांसाठी वीज कंत्राटी कामगार संप संघाच्यावतीने १ नोव्हेंबर, रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय वीज कंत्राटी कामगार संघाच्या पुणे येथील भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात केंद्रीय कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला.
www.konkantoday.com