
खेर्डीतील अनैतिक व्यापारप्रकरणी संशयिताला ३ वर्षानंतर मुंबई मधून अटक
खेर्डी येथे अनैतिक व्यापार आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल असलेला संशयित तब्बल ३ वर्षांपासून फरार झाला होता. अखेर तीन वर्षानंतर त्याला चिपळूण पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेत अटक केली.
अकिल इब्राहिम अरकाटे असे अटक केलेल्याचे नाव आहे. तीन वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधून एका तरुणीला खेर्डी येथे आणून तिला नोकरीचे आमिष दाखवून अनैतिक व्यापार करण्यास भाग पाडले होते. हे प्रकरण पोलिसांकडे पोहचल्यानंतर पोलिसांनी तपास यंत्रणा गतीमान केली होती. तसेच काहींवर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. शिवाय दहाजणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. यात संशयित अकिल अरकाटे याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तो फरार होता. अरकाटे याने अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतल होती. अखेर चिपळूण पोलिसांनी त्याला मुंबईतून ताब्यात घेवून अटक केली आहे.
www.konkantoday.com