बेमुदत संपावर जाणार्‍या आशाना त्रास दिल्यास याद राखा, संघटनेचा इशारा


जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांनी जिल्हा परिषदेवर धडक देत मंगळवारी जोरदार निदर्शने केली. महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिला आज १८ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याने त्याबाबतीत कोणत्याही महिलेस त्रास देता कामा नये. अन्यथा या महिला ही बाब सहन करणार नसल्याचा इशारा शिष्टमंडळाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील ७० हजार आशा व गटप्रवर्तक महिला आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. कोकणातून बेमुदत संपाची तयारी करण्ययात आली आहे. मंगळवारी जिल्हा परिषदेवर जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक महिला दुपारी बारा वाजेपर्यंत १ हजारापेक्षा जास्त संख्येने  जमल्या होत्या.
सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना दरमहा २६ हजार रुपये किमान वेतन द्या. २६००० किमान वेतनासह गटप्रवर्तक महिलांना दरमहा ८४५० रुपये स्वतंत्र प्रवास भत्ता द्या. ऑनलाईनचे सक्तीने काम देणे बंद करा. दिवाळीपूर्वी सर्व आशा व गटप्रवतक महिलांना किमान ५ हजार रुपये दिवाळी भाऊबीज द्या, आदी मागण्यांचा समावेश आहे. त्यासाठी निवेदने करून जिल्हा आरोग्य अदिकारी डॉ. आठल्ये यांना निवेदन देण्यात आले आहे. शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांची भेट घेत निवेदनावेळी चर्चेत कॉ. शंकर पुजारी यांनी राज्यपातळीवरील मागण्यांचे निवेदन दिले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button