
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक नामनिर्देशन सादर वेळेत वाढ: आता सकाळी 11 ते सायं 5:30-उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) – शुभांगी साठे
*रत्नागिरी दि.18 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक घेण्यात येणार असून, नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र (affidavit) संगणक प्रणालीव्दारे भरले जात आहे. मात्र, त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त होत आहेत. ही तांत्रिक अडचण महाआॕनलाईन कडून दूर करण्यात आली आहे. दिनांक 18 ऑक्टोबर 2023 ते दिनांक 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नामनिर्देशनाची सकाळी 11 ते दु. 3 वा. पर्यंतची वेळ सायं. 5.30 पर्यंत वाढविण्यात येत आहे, असे पत्र उप जिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शुभांगी साठे यांनी तहसीलदारांना पाठविले आहे.
तहसीलदार मंडणगड, दापोली, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर आणि राजापूर यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, राज्यातील 2359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक घेण्यात येणार असून, या कार्यक्रमानुसार संगणक प्रणालीव्दारे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असून, दिनांक 16 ऑक्टोबर 2023 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नामनिर्देशनपत्र सादर करण्यात येणार आहेत. त्यानुसार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 पासून संगणकप्रणालीव्दारे नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरु झाली आहे.
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक घेण्यात येणार असून, नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र (affidavit) संगणक प्रणालीव्दारे भरले जात आहे. मात्र, त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त होत आहेत. ही तांत्रिक अडचण महाआॕनलाईन कडून दूर करण्यात आली आहे. दिनांक 18 ऑक्टोबर 2023 ते दिनांक 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नामनिर्देशनाची सकाळी 11 ते दु. 3 वा. पर्यंतची वेळ सायं. 5.30 पर्यंत वाढविण्यात येत आहे.
www.konkantoday.com