कोकण कोस्टल मॅरेथॉन च्या प्रसार प्रचारासाठी विश्वविक्रमी आशिष कासोदेकर येणार रत्नागिरीत
“RUNटेल्स : गोष्ट विश्वविक्रमी रनर ची…” या मुलाखतीचे सुवर्णसूर्य फाऊंडेशन तर्फे आयोजन
रत्नागिरीकरांनी, रत्नागिरीकरांची आणि संपूर्ण जगासाठी आयोजित केली गेलेली अशी जिचा उल्लेख केला जातोय त्या कोकण कोस्टल मॅरेथॉन चे प्रमोशन जोरात सुरु आहे. रजिस्ट्रेशन ला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी होणाऱ्या या मॅरेथॉन च्या प्रॅक्टिस रन सुद्धा सुरु झाल्या आहेत.
याचच पुढचं पाऊल म्हणून विश्वविक्रमी रनर आशिष कासोदेकर शनिवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी रत्नागिरी मध्ये येत आहेत. संध्याकाळी ५:३० ते ७:३० या वेळेत Runटेल्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते रत्नागिरीकरांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम टी.आर.पी येथील अंबर हॉल मध्ये होणार आहे.
सलग ६० दिवसात ६० मॅरेथॉन धावल्याचा विश्वविक्रम आशिष कसोदेकर यांच्या नावावर आहे, नुकतीच त्यांनी लो टु हाय या उपक्रमाच्या माध्यमातून केरळ ते लडाख हे ४००० किमी अंतर ७६ दिवसात धावून पूर्ण केलं आहे, लडाख मध्ये ५५५ किमी धावलेले ते एकमेव भारतीय आहेत. Man’s World magazine ने त्यांचा समावेश भारतातील दहा टफेस्ट मॅन या यादीमध्ये केला आहे.
अशा आशिष कासोदेकर यांना ऐकण्यासाठी रत्नागिरीतील सर्व नागरिकांनी शनिवारी संध्याकाळी ५:३० वाजता अंबर हॉल टीआरपी इथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सुवर्णसूर्य फाउंडेशन च्या माध्यमातून करण्यात आले आहे.
www.konkantoday.com