
हरपुडे गावात गाव विकास पॅनलची एकहाती सत्ता, राजकीय पक्षांना बाजूला ठेऊन गावाचा सरपंच बसणार गावाच्या विकासासाठी तरुणांचा पुढाकार!
देवरूख:-हरपुडे गावात चुरशीची झालेली निवडणूक गाव विकास पॅनेलने जिंकल्याने ग्रामपंचायत मध्ये गाव पॅनलचा सरपंच बसणार हे निश्चित झाले आहे.
विकासाच्या मुद्यांवर गाव विकास पॅनेलने येथील निवडणूक लढवली होती.गाव विकास पॅनलचे काशिनाथ घुग हे सुरवातीलाच बिनविरोध निवडून आले होते.त्यानंतर 3 जागांसाठी झालेल्या निवडणूक मध्ये गाव विकास पॅनलचे राजेश भेरे, मनोज घुग,संजीवनी गुरव यांनी दणदणीत विजय संपादन केल्याने बहुमत साठी लागणारी संख्या गाव विकास पॅनेलने पूर्ण केली होती.बौद्ध वाडीतील बिनविरोध सदस्या सौ.निर्मला कांबळे यादेखील गाव पॅनलमध्ये सहभागी झाल्या आहेत त्यामुळे पॅनेलची ताकद वाढली आहे.गावाच्या विकासासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन गाव विकास पॅनेलने निवडणूक लढवली होती,त्यामुळे येथे कुठल्याही पक्षाचा सरपंच न बसता तो गावाचा सरपंच असेल अशी भूमिका गाव विकास पॅनलच्या सर्व सदस्य, मार्गदर्शक व समर्थकांनी घेतली आहे.कोणत्याही परिस्थितीत राजकीय पक्षांसोबत जायचे नाही,गावात पक्षीय राजकारणाला थारा न देता विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय सामूहिक पध्दतीने घ्यायचे असा निर्धार सर्व सदस्यांनी केला असून याच मुद्यांवर जनतेने स्पष्ट बहुमत गाव विकास पॅनलच्या बाजूने टाकले असल्याची भावना या सदस्यांनी व्यक्त केली आहे.
www.konkantoday.com