खासगी शिकवणीचालकांना कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याची परवानगी मिळणार
खासगी शिकवणीचालकांनी कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याची परवानगी मागितल्यास त्यांना ती देण्यात येईल असे महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी म्हणलेले आहे.शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वतीने ‘उल्हास नव भारत सारक्षता’ कार्यक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय शिक्षण परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयासह संगनमत करून खासगी शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांना शिकवले जाते.
त्यामुळे अकरावी बारावीच्या वर्गात विद्यार्थी अनुपस्थित असतात. शिकवणीचालकांनी याऐवजी स्वत:चे कनिष्ठ महाविद्यालय सुरु करून विद्यार्थ्यांना शिकवावे. त्यांनी अशी परवानगी मागितल्यास त्यांना तशी परवानगी देण्यात येईल असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना केसरकर यांनी सांगितले.
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीचे गुण आणि राज्य सामायिक प्रवेश परीक्षा ( सीईटी ) चे गुण एकत्रित करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात येईल. तसेच या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचीही माहिती केसरकर यांनी दिली.
www.konkantoday.com