
अतिक्रमणाविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे नाराज झालेल्या मिरकरवाडा येथील माजी नगरसेवकांसह अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे
रत्नागिरी :- मंगळवारी सकाळी मिरकरवाडा बंदरावर अतिक्रमणे तोडण्यास प्रशासनाने सुरुवात केली. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त मिरकरवाडा जेटीवर ठेवण्यात आला होता. सुमारे साडेतीनशेहून अधिक अतिक्रमणे उठवण्यासाठी प्रशासन ही कारवाई हाती घेण्यात आली. त्यामुळे येथील मच्छी विक्री करणाऱ्या महिलांच्या पोटावर पाय येत असून त्यामुळे त्यांचा रोजगार हिरावला जात आहे असा आरोप करत मिरकरवाडा येथील माजी नगरसेवकांसह अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत.
आपले राजीनामे घेऊन माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी सायंकाळी ना. सामंत यांच्या कार्यालयात दाखल झाले होते. सर्वप्रथम या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सोशल मीडियावर टाकले. यामध्ये माजी नगरसेवक सोहेल साखरकर, नुरुद्दीन पटेल यांच्यासह अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता या कारवाई प्रकरणी मंत्री उदय सामंत कोणता निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागले आहे
Www.konkantoday.com