
कशेडी बोगदा ते परशुराम घाट दुभाजकाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप
खेड तालुक्यातून जाणार्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कशेडी बोगदा ते परशुराम घाट या टप्प्यात महामार्गाच्या दुभाजकावर झाडे लावण्याच्या कामात मोठा गैरव्यवहार झाला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अन्यथा उपोषण करून लक्ष वेधण्याचा इशारा रूपेश पवार यांनी पोलीस व प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.पवार यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार राष्ट्रीय महामार्ग बांधकाम उपविभाग रोहा-रायगड यांच्याकडून माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली होती. www.konkantoday.com