
एसटी कर्मचार्यांनासुद्धा ५० लाखाचे विमा कवच मंजूर
कोरोना संकटकाळात स्वतःच्या जीवावर उदार होऊन काम करत असलेल्या एसटी कर्मचार्यांनासुद्धा ५० लाखाचे विमा कवच मंजूर केल्याची माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली. दरम्यान, मान्यताप्राप्त संघटनेच्या पाठपुराव्यामुळेच ही मागणी मान्य झाल्याचा दावा एसटी कामगार संघटनेने केला आहे. तर इंटक संघटनेच्या प्रयत्नांमुळेच एसटी कर्मचार्यांना हे विमा कवच मिळाल्याचे इंटकने म्हटले आहे.
www.konkantoday.com