
मालगुंड बौद्धवाडी येथील नवीन रस्त्यावर बिबट्याचा वावर
मालगुंड येथील सुतारवाडीजवळचा सतीचा वड ते बौद्धवाडी वस्तीकडे जाणाऱ्या नवीन रस्त्यावर सध्या बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे.
या बिबट्याने बौद्धवाडीतील ग्रामस्थ अनिल लक्ष्मण पवार यांच्या मालकीच्या बकरीला जखमी केले असून याच ठिकाणच्या दुचाकीवरून जाणाऱ्या युवकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही उघडकीस आला आहे .
तसेच बौद्धवाडीतील काही दुचाकीस्वारांना देखील बिबट्याचे दर्शन घडले आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी मालगुंड ग्रामपंचायतीला माहिती देऊन कळविले आहे.
मात्र अद्याप कुठलीही कार्यवाही संबंधित विभागाकडून करण्यात आलेली नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
www.konkantoday.com