
सीए ब्रॅंचतर्फे स्टॉक मार्केट, इन्कमटॅक्समधील तरतुदीबाबत चर्चासत्र
रत्नागिरी : रत्नागिरी सीए ब्रॅंचतर्फे दिनांक २१ ऑक्टोबर रोजी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक आणि त्यासंबंधी इन्कमटॅक्समधील तरतुदी या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या विषयाचे महत्त्व तसेच सामान्य गुंतवणूकदार यांचा या विषयातील रस लक्षात घेता या वेळचे चर्चासत्र सीए आणि कर सल्लागार याशिवाय इतर गुंतवणूकदार यांच्यासाठी देखील खुले ठेवण्यात आले आहे.
स्टॉक मार्केट ट्रेडिंग मंत्रा, गुंतवणूकदार मानसिकता, फ्युचर आणि ऑप्शन्स यावर सीए निखिलेश सोमण (ठाणे) मार्गदर्शन करणार आहेत. तसेच स्टॉक मार्केटमधील गुंतवणूक आणि आयकर तरतुदी याबाबत सीए अनुप शहा (रत्नागिरी) व्याख्यान देणार आहेत.
हा कार्यक्रम हॉटेल व्यंकटेश, मारुती मंदिर रत्नागिरी येथे होणार आहे. दिनांक २१ ऑक्टोबरला सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत कार्यक्रम होईल. यासाठी रजिस्ट्रेशन फी १५०० रुपये आहे. या कार्यक्रमासाठी मर्यादित जागा असल्याने आपली नावे दिनांक १९ ऑक्टोबरपर्यंत सीए कपिल लिमये – 8379898217, सीए नेहा वारेकर – 8806922973 यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन सीए ब्रॅंचने केले आहे.
www.konkantoday.com