
दशावतार पाहताच राज ठाकरे भारावले, म्हणाले गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्राला हेच सांगत आहे
सध्या दशवातार या मराठी चित्रपटाची राज्यभर चर्चा होत आहे. ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.दशावतार या चित्रपटातून हाताळण्यात आलेल्या मुद्द्याचीही सध्या चर्चा आहे. दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील हा चित्रपट पाहिला असून त्यांनी चित्रपटाविषयी खास प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकानेच पाहावा असा हा चित्रपट असून प्रत्येक संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी एका मुद्द्याची आठवण करून दिली आहे. त्यांनी या चित्रपटात काम करणाऱ्या सर्वच कलाकारांचे तोंडभरून कौतुक केले आहे.दशावतार या चित्रपटात गंभीर विषयाला हात घालण्यात आला आहे. गेली अनेक वर्ष मी महाराष्ट्राला हीच गोष्ट सांगत आहे की आपल्याकडच्या जमिनी वाचवा. कारण जमिनी हे तुमचं अस्तित्व आहे. हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे. हा प्रकार फक्त एकट्या कोकणामध्ये होतो असा भाग नाही. हा विषय अत्यंत चालाखीने चित्रपटाच्या माध्यमातून मांडला आहे, असे कौतुक राज ठाकरे यांनी केले. तसेच दशावताराच्या सर्व रूपांमधून महाराष्ट्रातील ही समस्या समोर आली असल्याचेही ते यावेळी म्हणाले.




